Join us  

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर शिवसेना-भाजपा आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:12 AM

आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे मनसुबे पहारेकऱ्यांनी आखले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला देण्यात येणा-या भूखंडावरून राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबई  - आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे मनसुबे पहारेकऱ्यांनी आखले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला देण्यात येणा-या भूखंडावरून राजकीय वातावरण तापले आहे. चार वर्षांच्या विलंबानंतर सुधार समितीच्या बैठकीत सादर झालेला याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेने रोखताच भाजपाने रान उठवले. विरोधकांचे समर्थन मिळाल्यामुळे अखेर बैठक तहकूब करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली.गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाला भूखंडाचे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत गुरूवारी मंजुरीसाठी प्रशासनाने आणला. या प्रस्तावात अनेत त्रुटी असल्याने सत्ताधारी शिवसेनेने तो राखून ठेवला. त्यामुळे भाजपसह विरोधक आक्रमक होत गिरणी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी सुरू केली. परिणामी ही बैठक तहकूब करण्याची वेळ सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्यावर आली.अध्यक्षांनी प्रस्ताव राखून ठेवणे व भूखंडांच्या ठिकाणी पाहणी करावी का याबाबत मतदान घेतले. यावरून भाजपा, काँग्रेस, सपाच्या नगरसेवकांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीचा निषेध करीत ह्यनही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगीह्ण अशी घोषणाबाजी केली. तर काँग्रेस, सपाच्या नगरसेवकांनी सुधार समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मध्यस्थीनंतर विरोधकांनी आंदोलन मागे घेतले.चार वर्षे रखडला घरांचा प्रश्नदादर, परेल, काळाचौकी येथील मफतलाल, एम एम टी सी, मातुल्य मिल, हिंदुस्तान मिल, व्हिक्टोरिया, हिंदुस्तान मिल या सहा गिरण्यांचा ३६०७ चौरस मीटर भूखंड पालिकेला मिळणार आहे. त्याबदल्यात पालिका शिवडी येथील आपला भूखंड म्हाडाला गिरणी कामगारांना घरे बांधून देण्यासाठी देणार आहे. २०१५ पासून चार वर्षात म्हाडा आणि पालिकेत भूखंड आदलाबदलीचा निर्णय न झाल्याने गिरणी कामगारांना घरे मिळण्यास दिरंगाई झाली आहे.कुठल्याही प्रस्तावार बोलणे सदस्यांचा अधिकार आहे. मात्र सुधार समितीत अध्यक्ष कोणालाही बोलू देत नाही, हा सदस्यांचा अपमानच आहे.- ज्योती अळवणी(नगरसेविका -भाजपा)सुधार समितीत काँग्रेसने विरोध केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. काँग्रेसने सभात्याग करीत ठिय्या आंदोलन केले, त्या ठिय्या आंदोलनात भाजप सदस्य का सहभागी झाले नाहीत.- दिलिप लांडे(अध्यक्ष - सुधार समिती)

टॅग्स :राजकारणशिवसेना