Join us

शिवरायांच्या जयघोषाने ताडदेव दुमदुमला; चिमुकल्यांमध्येही उत्साह संचारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2023 21:51 IST

दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये देखील शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये देखील शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवजयंती सोहळ्यात ढोल पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी आणि मर्दीनी खेळ ठेवण्यात आले होते. या सोहळ्यात शेकडो शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता. 

या सोहळ्यात चिमुकल्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह पाहण्याजोगा होता. ताडदेवमधील प्रसिद्ध शिवगणेश मंदीर येथून ही मिरवणूक काढण्यात आली आणि संपूर्ण ताडदेव परिसरात फिरवण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या सोहळ्यात उपस्थिती लावली. 

ताडदेव गणेशोत्सव मंडळाकडून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबीर, नेत्रदान, विविध आजारांवरील उपचार, गरीब विद्यार्थ्यांना मदत यासारखे उपक्रम घेतले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी दिली.

टॅग्स :शिवजयंतीमुंबई