कर्जत : कर्जत मधील साई प्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेवून पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेवून शिर्डी कडे निघाले तेंव्हा त्यांना कर्जतच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी असंख्य भाविकांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. आठव्या दिवशी ही पालखी शिर्डीला पोहोचेल तेथून साईबाबांचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेवून कर्जतला येईल त्यानंतर भंडार्याचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री दत्त मंदिरामध्ये साईबाबांची प्रतिमा पहाटेच दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. अनेक भाविकांनी दर्शन घेतल्या नंतर सार्इंची प्रतिमा सजावट केलेल्या पालखी मध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष राजेश लाड व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर पालखीची मिरवणूक कर्जत शहरातून वाजत गाजत काढण्यात आली. अध्यक्ष अरविंद झुंजारराव, संतोष तथा सटू दाभणे, पंकज शिंदे,राजन भोळे, आदींच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीकडे निघाली. पायी पालखीचा पिहला मुक्काम वारे येथील हनुमान मंदिरात, दुसरा मुक्काम जायगाव येथील पोलीस पाटीलांकडे, तिसरा मुक्काम सितेवाडी येथील महेंद्र किराणा दुकान परिसरात, चौथा मुक्काम पिंपरी पेंढार येथील सीताराम महाराज सेवा मंडळात, पाचवा मुक्काम धारगाव मधील लक्ष्मी मंगल कार्यालयात, सहावा मुक्काम निलवंडे येथील जिल्हा परिषद शाळेत, सातवा मुक्काम नांदुर्खी येथील गोपाळ कृष्ण मंदिरात होणार असून दुसर्या दिवशी ही पालखी पहाटे शिर्डीला पोहोचणार आहे. (वार्ताहर)
दीडशे साईभक्तांची पायी शिर्डीवारी
By admin | Updated: February 5, 2015 01:02 IST