मुंबई : बलात्काराप्रकरणी सात वर्षाची शिक्षा झालेला अभिनेता शायनी अहुजाच्या शिक्षेविरोधातील अपिलावर तात्काळ सुनावणी
घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आह़े
14 जून 2क्क्9 रोजी ही घटना घडली़ शायनीने त्याच्या अंधेरी येथील राहत्या घरात मोलकरणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला होता. सत्र न्यायालयाने 3क् मार्च 2क्11 रोजी शायनीला दोषी ठरवत सात वर्षाची शिक्षा ठोठावली़ शायनीने या निर्णयास उच्च न्यायलायात आव्हान दिल़े त्यानंतर उच्च न्यायालयाने 27 एप्रिल 2क्11 मध्ये शायनीला जामीन मंजूर केला व त्याचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतल़े मात्र याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यावी, अशी मागणी शायनीने न्यायालयाकडे केली़ शिक्षा झाल्याने मला चित्रपटात काम देण्यास कोणी तयार
नाही. त्याचा माङया करिअरवरही परिणाम झाला आह़े तेव्हा माङया अपिलावर तात्काळ सुनावणी करावी, असा युक्तिवाद शायनीच्या वकिलाने केला. (प्रतिनिधी)
च्न्या़ साधना जाधव यांनी त्याचे अपील फेटाळून लावल़े न्यायालयात 1993-94 पासूनच्या आव्हान याचिका प्रलंबित आहेत़ त्यामुळे शायनीच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेता येणार नाही़
च्एका वर्षात त्याच्या अपिलावर सुनावणी न झाल्यास त्याने स्वतंत्र अर्ज करावा, असे न्यायालयाने नमूद केल़े