Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीच्या कंपनीवर गुन्हा

By admin | Updated: April 28, 2017 03:30 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा, दर्शित शहा, उदय कोठारी, वेदांत बाल्टी यांच्या बेस्ट डिल टीव्ही प्रा. लि.कंपनीवर

भिवंडी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा, दर्शित शहा, उदय कोठारी, वेदांत बाल्टी यांच्या बेस्ट डिल टीव्ही प्रा. लि.कंपनीवर कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.गोरेगावमधील रवी भालोटिया यांची भालोटिया एक्स्पोर्ट कंपनी आॅनलाईन शॉपिंग कंपन्यांना बेडशीट पुरवते. शिल्पाच्या कंपनीने कॉलसेंटर व ई मेलवरून बेडशीटच्या मालाच्या मागणीनुसार माल पुरविला. त्यातून आलेले २४ लाख १२ हजार ८७७ रूपये कंपनीच्या बँक अकाऊन्टवर जमा केले. पण ते व्हेंडर अ‍ॅग्रिमेंट व बिल नोटप्रमाणे भालोटिया एक्स्पोर्ट कंपनीला दिले नाहीत. रकमेचा अपहार केल्याप्रकरणी भालोटिया यांनी बेस्ट डील कंपनी आणि तिच्या सर्व संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)