खालापूर : खालापूरसह खोपोली शहरास दुपारनंतर वादळी वार्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या गारव्याने ओले चिंब केले. सुरुवातीला वादळ आल्याने महावितरणने खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केला. संपूर्ण खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, नुकसानीच्या वृत्ताला आपत्ती विभागाकडून दुजोरा देण्यात आला नसून वित्तहानी असल्यास महसूल प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन आपत्ती विभागाच्या अधिकार्यांनी केले आहे. महड गाव येथे लघु दाबाचा विद्युत पोल कोसळला असून काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. त्या सर्व काढण्याचे काम सुरु केले असून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल, असे उपमुख्य अभियंता एस. मेश्राम यांनी सांगितले..
शेवंतीची बाग फुलली :
By admin | Updated: May 27, 2014 23:39 IST