ठाणे : दिव्यात दिवसाढवळ्या बाहेर येणाऱ्या सर्पांना जीवनदान देण्यासाठी व्यवसायाने डान्सर असलेल्या मनोज भोईर (मुन्ना) या सर्पमित्राची गेल्या काही वर्षांपासून धडपड सुरु आहे. सर्प पकडण्याचे क ोणतेही प्रशिक्षण नसतानाही त्याने १०० हून अधिक सर्प पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. प्राण्यांवर प्रेम करा, असे नुसते म्हटले जाते. मात्र, हे विचार प्रत्यक्षात कोणी आणत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. गेल्या क ाही दिवसांपासून दिव्यात होणाऱ्या शहरीकरणामुळे सर्प बाहेर येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. त्यात घाबरून त्यांना मारण्यात येते ही बाब मनाला लागल्याने लहानपणापासून खाडीतील साप पकडण्यास सुरुवात केली. त्यातून मग त्याचा सर्प पकडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत १०० ते १२५ विविध प्रकारचे सर्पांबरोबर घोरपड ही पकडली आहे. या वर्षात ६० सर्प पकडले असून त्यांना पकडण्यासाठी लागणारी स्टीक त्याने स्व:त बनवली आहे. आतापर्यंत पकडलेल्या सर्पांमध्ये ८ ते १० फुट लांबीचे मोठे सर्प पकडून सुरक्षित ठिकाणी सोडल्याचे तो सांगतो. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवन देण्यासाठी त्यांना पकडण्याचे प्रशिक्षण घ्यायचे असून सर्प पकडणे ही आपली आवड असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. (प्रतिनिधी)
दिव्यातील प्रोफेशनल डान्सर झाला सर्पमित्र
By admin | Updated: July 16, 2015 23:40 IST