Join us
Daily Top 2Weekly Top 5

शीनानेही दिली होती इंद्राणीला धमकी

By admin | Updated: August 27, 2015 01:42 IST

राहुल आणि माझ्यात ढवळाढवळ करू नका अन्यथा मी तुझी मुलगी आहे हे सर्वांना सांगेन, अशी धमकी शीनाअखेरच्या काही दिवसांमध्ये इंद्राणीला देत होती, अशी माहिती पुढे येत आहे.

मुंबई : राहुल आणि माझ्यात ढवळाढवळ करू नका अन्यथा मी तुझी मुलगी आहे हे सर्वांना सांगेन, अशी धमकी शीनाअखेरच्या काही दिवसांमध्ये इंद्राणीला देत होती, अशी माहिती पुढे येत आहे. शीना ही मुंबई मेट्रोमध्ये २0 जून २0११ पासून साहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. २४ एप्रिल २0१२ पासून ती सुटीवर गेली आणि त्यानंतर थेट राजीनाम्याचे पत्रच मुंबई मेट्रोला पाठवल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे. मात्र २४ एप्रिल २0१२ रोजी शीना बोराची हत्या झाल्यानंतर तिचा राजीनामा कोणी पाठवला, त्यावर सही कोणी केली, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. (प्रतिनिधी)खार पोलिसांनी इंद्राणी व तिचा ड्रायव्हर श्याम राय यांना समोरासमोर ठेवून अनेकदा चौकशी केल्याची माहिती मिळते. चौकशीत दोघांनी शीनाच्या हत्येचे खापर एकमेकांवर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.