Join us

ती माङया बहिणीसारखी - पारसकर

By admin | Updated: August 7, 2014 01:38 IST

बलात्काराचा आरोप करणारी ती मॉडेल-अभिनेत्री माङया बहिणीसमान असून तसे मी तिला ई-मेलद्वारेही संबोधले होते, असा युक्तिवाद वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला़

मुंबई : बलात्काराचा आरोप करणारी ती मॉडेल-अभिनेत्री माङया बहिणीसमान असून तसे मी तिला ई-मेलद्वारेही संबोधले होते, असा युक्तिवाद वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला़
गेल्या महिन्यात या मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली आह़े त्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पारसकर यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आह़े त्यावरील सुनावणीत अॅड़ रिझवान र्मचट यांनी पारसकर यांच्या वतीने हा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, बहीण संबोधणा:या ई-मेलचे तक्रादार मॉडेलने काहीच उत्तर दिले नाही़ मात्र ती वारंवार आपण मित्र असल्याचा ई-मेल करत होती़ तसेच ही तक्रार करण्याआधी ती तिच्या विधी सल्लागारला पारसकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली जाईल की नाही, याबाबत विचारत होती़
महत्त्वाचे म्हणजे मानसिक तणावामुळे तक्रार उशिरा  केल्याचे या मॉडेलचे म्हणणो आह़े दरम्यान, तिच्या टि¦टर अकाऊंटवरील मजकुरातून असे काहीच जाणवत नाही़ त्यामुळे ही तक्रार केवळ पारसकर 
यांना अडकवण्यासाठी केली असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी अॅड़ र्मचट यांनी केली़ त्याच वेळी पोलिसांनी पारसकर यांना आवाजाच्या चाचणीसाठी पत्र दिल़े तसेच यावर उद्या गुरूवारीपासून सरकारी पक्ष युक्तिवाद करणार आह़े