Join us

वयाच्या सातव्या वर्षी तिने पाहिले जग!

By admin | Updated: December 9, 2014 03:08 IST

जन्मत: अंध असलेल्या एका चिमुकलीला वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदाच आईबाबांचा चेहरा पाहायला मिळाला.

छायाला दृष्टी : मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया 
मुंबई : जन्मत: अंध असलेल्या एका चिमुकलीला वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदाच आईबाबांचा चेहरा पाहायला मिळाला. हा प्रकार दादरच्या कमला मेहता अंध विद्यालयात शिकणा:या सातवर्षीय छाया कलपडच्या बाबतीत घडला. छायाला जन्मत: दोन्ही डोळ्य़ांत मोतीबिंदू होता, मात्र याचे निदान न झाल्याने ती अंध आहे असेच तिच्या पालकांना वाटत राहिले. आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर छायाला दृष्टी मिळाली आहे. 
2क्क्6 मध्ये वाशिममध्ये छायाचा जन्म झाला. जन्माच्या वेळी छायामध्ये कोणतेही व्यंग असल्याचे डॉक्टरांना आढळले नव्हते. तिची तपासणी केल्यावर ती अंध असल्याचे पालकांना सांगण्यात आले. 2क्12 मध्ये छायाला कमला मेहता अंध विद्यालयात दाखल केले. विद्यालयात ओजस डोळ्य़ांच्या रुग्णालयातर्फे डोळे तपासणी शिबिर भरवले होते.  डॉ. नितीन देढिया यांनी छायाच्या डोळ्य़ाची तपासणी केल्यावर तिला प्रकाश काही प्रमाणात दिसतो, असे त्यांना जाणवले. 
यानंतर त्यांनी छायाला रुग्णालयात नेऊन तिची तपासणी केली. या वेळी तिच्या डोळ्य़ांचे स्नायू कार्यरत आहेत. मात्र तिला मोतीबिंदू असल्यामुळे दिसत नसल्याचे निदान झाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये तिच्या  डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण पाहायचे ही क्रिया तिला माहीतच नव्हती. यामुळे तिच्या मेंदूने डोळ्य़ांच्या स्नायूंना त्या पद्धतीने कार्य करण्याचे आदेश कधीच दिले नव्हते. यामुळे या स्नायूंची कार्यक्षमता कमी झाली होती. गेल्या वर्षभरात तिला 5क् ते 6क् टक्के दृष्टी आल्याचे डॉ. देढिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
शंभरामागे एका बाळाला मोतीबिंदू
जगभरात 1क्क् मुलांमागे एकाला जन्मत: मोतीबिंदू असतो. व्हिटॅमिन डीची कमतरता, गर्भवती महिलेला संसर्ग झाला, ती आजारी पडली तर बाळाला अशा प्रकारचे आजार होण्याचा धोका संभावतो.