मुंबई : पाच महिन्यांपूर्वी समुद्रात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहामागचे गूढ अद्याप कायम आहे.गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी कफपरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. तिने लाल टी शर्ट परिधान केले होते. ज्या चादरीत तिचा मृतदेह आढळून आला त्या चादरीवर जीएल असे लिहिलेले आहे. तिच्या मृतदेहापाशी एक अर्धवट फोटोही आढळून आला. मात्र अद्याप त्या महिलेची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी कफपरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ महिलेच्या मृत्यूमागचे गूढ कायम
By admin | Updated: April 15, 2017 02:16 IST