Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरद राव यांची प्रकृती स्थिर

By admin | Updated: November 30, 2014 01:51 IST

फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक यासह विविध संघटनांचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मुंबई : फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक यासह विविध संघटनांचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात शरद राव यांना पोटाच्या विकारावरील शस्त्रक्रियेसाठी रविवारी दाखल करण्यात आले होते. राव यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील दहाएक दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असे त्यांचे पुत्र शशांक राव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)