Join us  

Sharad Pawar: 'मी राणेंना महत्त्वच देत नाही'; शरद पवारांनी राणे प्रकरणावर बोलणं टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 2:35 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्याचं राजकारण जोरदार तापलेलं आहे. राणेंविरोधात ...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्याचं राजकारण जोरदार तापलेलं आहे. राणेंविरोधात पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यावर राज्यातील विविध नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याप्रकरणावर काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. पवारांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मी महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांनी निवासस्थानाबाहेर निघताना कारमधूनच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्याचं पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवारांनी 'मी राणेंना महत्त्व देत नाही. त्यावर काय बोलायचं?' इतकंच भाष्य करत संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आणि ते नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. 

संजय राऊत म्हणाले कारवाई होणारच"केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कारवाई ही होणारच", असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राणेंविरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. "तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात ती शाळा आजूनही अबाधित आहे हे लक्षात ठेवावं", असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेचं समर्थन केलं आहे. 

राणेंच्या राजीनाम्याची मागणीशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर टीका कलेल्या राणेंना मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. केंद्रात आपलं सरकार असल्याचं सांगून नारायण राणे जर राज्यात नंगा नाच घालत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहन करतील असं वाटत नाही. ते नक्कीच राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. 

टॅग्स :शरद पवारनारायण राणे