कर्जत : तालुका शेतकरी सहकारी खरेदी - विक्री संघाच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. सभापतीपदी शरद लाड, तर उपसभापतीपदी विनय वेखंडे यांची बिनविरोध निवड केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस यांची आघाडी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत शूल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र कदम, संस्थेचे व्यवस्थापक केतन खडे, संचालक परशुराम घारे, हरेश घुडे, धनंजय चाचड, यशवंत जाधव, बळीराम देशमुख, नामदेव बदे, शरद लाड, विनय वेखंडे, विष्णू कालेकर, नाथा धुळे, हिराताई दुबे, कांता पेमारे, दत्तात्रय भोईर, रमेश सांगळे, सखाराम रोकडे हे उपस्थित होते. सभापतीपदासाठी शरद लाड यांचा एकमेव अर्ज होता. त्यांना परशुराम घारे यांनी सूचक तर हिराताई दुबे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आणि उपसभापतीपदासाठीही विनय वेखंडे यांचा एकमेव अर्ज होता. त्यांना सूचक व अनुमोदन दिल्यानंतर व दोघांचेही अर्ज वैध ठरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूळ यांनी लाड व वेखंडे निवडून आल्याचे जाहीर केले. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार अध्यक्ष सीताराम मंडावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, त्यानंतर नगराध्यक्ष राजेश लाड, उपनगराध्यक्ष पुष्पा दगडे, सहकार अध्यक्ष सीताराम मंडावळे, सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष मनोहर देशमुख, बाळू थोरवे आदींनी अभिनंदन केले. आमची आघाडी भक्कम आहे, म्हणून ही निवडणूक या वेळीही बिनविरोध झाली. यंदा गोदामाची उपलब्धता नसल्याने हमी भावाने भात खरेदी करता आला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा दिल्यास त्या जागेवर गोडाऊन बांधून हमी भावाने भात खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे अध्यक्ष सीताराम मंडावळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
खरेदी-विक्र ी संघाच्या सभापतीपदी शरद लाड
By admin | Updated: April 18, 2015 23:06 IST