ठाणे : राज्यातील रहिवासी असलेल्या युद्ध विधवा आणि शौर्यपदक धारक (केवळ परमवीर चक्र , महावीर चक्र , वीरचक्र , शौर्यचक्र , किर्तीचक्र व अशोकचक्र ) यांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास करता येणार आहे. राज्यात २५०० कि.मी. पर्यंतच्या प्रवासासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता ३५८६ रूपये अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. ठाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी त्यांच्याजवळील कागदपत्रासह या योजनेसाठी ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}