Join us

टि¦टवर भडकला शाहरुख

By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर देश सोडून पाकिस्तानात जाईल, असे टि¦ट शाहरुख खानने केले असल्याचा गैरसमज लोकांमध्ये आहे.

शाहरुख खानने सोशल नेटवर्किग साईट टि¦टरवर त्याचा राग जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर देश सोडून पाकिस्तानात जाईल, असे टि¦ट शाहरुख खानने केले असल्याचा गैरसमज लोकांमध्ये आहे. खरे तर शाहरुखने असे टि¦ट कधीच केले नव्हते. तरीही त्याची टि¦टर, व्हाटस् अॅप, फेसबुकवर निंदा केली जात आहे. लोकांनी असे मेसेज शेअर केले, पण त्याबाबत खरी माहिती जाणून घ्यायची उत्सुकता कोणी दाखवली नाही. हा गैरसमज एसआरके (शाहरुख खान) आणि केआरके (कमाल आर खान) या जवळपास सारख्याच नावांमुळे झाला. कमाल आर खानने टि¦ट केले होते, मोदी पंतप्रधान झाल्यास तो देश सोडेल, बोलल्याप्रमाणो तो वागलाही; पण केआरकेऐवजी राग एसआरकेवर काढला जात आहे. काही ठिकाणी तर शाहरुख भारत छोडो, असे पोस्टरही लागले आहेत. त्यामुळे शाहरुख खान भडकला आहे.