ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - गँगस्टर रवी पुजारीकडून धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खानच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर रवी पुजारीकडून शाहरुखलाही फोन करण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सध्या शाहरुख त्याच्या आगामी 'हॅपी न्यू ईयर' या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.