Join us  

शहीद कामटे यांच्या पत्नीची पर्स चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 5:46 AM

टकटक टोळीतील लुटारूंवर गुन्हा दाखल

मुंबई : शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांची पर्स टकटक टोळीने पळविल्याची घटना नुकतीच वरळीत घडली. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात टकटक टोळीतील दोन लुटारूंविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनीता या मैत्रिणीसोबत बँकेत गेल्या होत्या. त्यांची मैत्रीण कारमध्येच थांबली. त्या बँकेत निघून गेल्या. दरम्यान, टकटक टोळीतील लुटारूने, कारच्या काचेवर टकटक करत, विनीता यांच्या मैत्रिणीला बाहेर पैसे पडल्याचे सांगितले. ते पाहण्यासाठी त्यांनी बाहेर डोकावताच, त्याचा अन्य एका साथीदाराने कारमधील विनीता यांची पर्स पळविली. पर्समध्ये १० हजार रुपयांच्या रोकडसहित दागिने होते. विनीता बँकेतून परत येताच, कारमधील पर्स गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मैत्रिणीला विचारताच वरील घटनाक्रम उघडकीस आला. त्यानुसार, त्यांनी वरळी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.

टॅग्स :चोरी