Join us

शहा - पवार भेटीने तर्कवितर्क

By admin | Updated: December 14, 2014 02:28 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ब्रीच कँडी इस्पितळात जाऊन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ब्रीच कँडी इस्पितळात जाऊन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांची सिंचन घोटाळ्य़ात तर छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्य़ात लाचलुचपत खात्यामार्फत गुन्हे दाखल करून चौकशी करण्यास सरकारने शुक्रवारी अनुमती दिली असताना शहा यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. दिल्लीत निवासस्थानी पडल्याने पवारांवर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत. 
 
फडणवीस, शेलारांशी चर्चा
शहा यांनी शेलार यांच्याशी तब्बल अडीच तास चर्चा केली. शेलार यांचे नाव भाजपा प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुका, राज्यात व मुंबईत करायचे संघटनात्मक बदल, सेनेसोबत करायची युती व त्यामधील अडथळे अशा बाबींवर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही शहांची चर्चा झाली.