Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये चिमुरडीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST

नेरूळ येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी शिकत असलेल्या रेड कॅमल प्रीस्कूलमधील शिक्षकानेच हा प्रकार केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नवी मुंबई : नेरूळ येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी शिकत असलेल्या रेड कॅमल प्रीस्कूलमधील शिक्षकानेच हा प्रकार केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.नेरुळ येथील रेड कॅमल इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये २३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. शाळेतील शिक्षकाने आपल्यासोबत गैरचाळे केल्याची तक्रार तेथे शिकणाऱ्या पाच वर्षीय मुलीने तिच्या आईकडे केली. मुलीच्या तक्रारीनुसार तिच्या आईने शाळा व्यवस्थापनाकडे या शिक्षकासंदर्भात तक्रार केली होती. परंतु मुलीचे वडील नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असल्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. ते परत आल्यानंतर सोमवारी यासंदर्भातची तक्रार नेरुळ पोलिसांकडे दाखल झाली आहे. परंतु पालकांच्या तक्रारीवरून शाळा व्यवस्थापनाने नोकरीवरून काढल्याने हा शिक्षक बिहार येथे मूळ गावी पळालेला असल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता असलेल्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यानुसार सदर शिक्षकाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)