Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: July 6, 2017 07:01 IST

दिंडोशी आणि कफपरेडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिंडोशी आणि कफपरेडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी दिंडोशी आणि कफपरेड पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशीच्या एका सोसायटीत ४ वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. त्याच इमारतीत आरोपी १५ वर्षांचा मुलगा राहण्यास आहे. मंगळवारी कार्टून बघायला नेतो, असे सांगून तो मुलीला घरी घेऊन गेला. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत, चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. ही बाब सोसायटीमध्ये पसरताच, आईने मुलीसह दिंडोशी पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात १५ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत. सोमवारी रात्री कफपरेड परिसरात राहत असलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर त्याच परिसरातील तरुणाने लैंगिक अत्याचार केले. त्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर, मुलीने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. मुलीच्या तक्रारीवरून कफपरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुलकुमार राऊतला (२२) पॉक्सो, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.