Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: February 25, 2016 00:37 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुबारक मोहम्मद अली चौधरी (२२, रा. वागळे इस्टेट) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुबारक मोहम्मद अली चौधरी (२२, रा. वागळे इस्टेट) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याला २९ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली.आधी लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी जवळीक साधली. त्याचाच गैरफायदा घेऊन तो गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. तिने प्रतिकार केल्याने तो धमकी देऊ लागला. त्याने तिच्यावर बलात्कार केला त्यातूनच तिला गर्भधारणा झाली. याप्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. याची कुणकुण लागताच तो पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी गवते, हवालदार प्रकाश आव्हाड, सुरेश यादव आदींच्या पथकाने त्याला इंदिरानगरनाका येथून २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. (प्रतिनिधी)