Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: January 7, 2016 02:22 IST

पवईमध्ये १० वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

मुंबई: पवईमध्ये १० वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी अजित यादवला पवई पोलिसांनी पॉस्को आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पवई येथील साकी विहार परिसरात १० वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी दुपारच्या सुमारास तिचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले होते. यादवच्या घरातील मंडळी मार्केटमध्ये गेले असल्याने तो एकटाच होता. या संधीचा फायदा घेत, यादवने या मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सायंकाळी घरी परतलेल्या आईकडे या मुलीने यादवच्या कृत्याला वाचा फोडली. आईने तत्काळ पवई पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पवई पोलिसांनी यादवच्या मुसक्या आवळल्या. मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)