Join us

फादरकडून मुलावर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: December 2, 2015 02:40 IST

शिवाजी नगरमधील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेल्या तेरा वर्षाच्या मुलावर चर्चच्या फादरनेचे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी

मुंबई : शिवाजी नगरमधील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेल्या तेरा वर्षाच्या मुलावर चर्चच्या फादरनेचे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी फादर जॉन्सन लॉरेन्स क्रीसीस (५२) यांच्याविरुद्ध बाल अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी नगर येथील द किंग चर्चमध्ये १३ वर्षीय राजू (नाव बदलले आहे) कुटुंबियांसोबत २७ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास प्रार्थनेसाठी गेला होता. प्रार्थनेनंतर त्याचे कुटुंबियही पुढे निघून गेले. चर्चमधील फादर जॉन्सनने राजूला काही साहित्य उचलून खोलीत ठेवण्यास सांगितले. साहित्य ठेवत असताना फादरने आतून दरवाजा बंद करीत राजूचे लैंगिक शोषण केले. राजू घरी परतल्यानंतर त्याच्या गुप्तांगास त्रास होत असल्याने तो रडत होता. याबाबत आईने विचारणा केली असता, त्याने हा प्रकार सांगितला. राजूच्या पालकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.