Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: August 2, 2015 20:02 IST

जेमतेम एक वर्षाच्या चिमुरड्यावर मावसभावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाकोला परिसरात घडली. चिमुरड्याच्या आईसमोर हा प्रकार उघड होताच तिने वाकोला पोलीस ठाण्यात

मुंबई : जेमतेम एक वर्षाच्या चिमुरड्यावर मावसभावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाकोला परिसरात घडली. चिमुरड्याच्या आईसमोर हा प्रकार उघड होताच तिने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून विकृत मावसभावाला वाकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.सांताक्रूझ येथील कलिना परिसरात तक्रारदार महिला कुटुंबासह राहते. त्याच परिसरात तिची बहीण राहण्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून बहिणीचे कुटुंबीय गावी गेले असल्याने तिचा मुलगा तक्रारदार महिलेच्या घरी राहण्यास होता. तो गार्मेंटमध्ये कामाला आहे. तक्रारदार महिला व तिच्या पतीच्या अनुपस्थितीत दोन मुलांचा सांभाळ आरोपी करत होता. २९ जुलै रोजी नेहमीप्रमाणे आरोपी तरुण तक्रारदार महिलेच्या घरी आला. मुलाला फिरवून आणतो, असे सांगून त्याने मुलाला स्वत:च्या घरी नेले. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत मुलावर लैंगिक अत्याचार केले. घरी परतलेल्या आईने मुलाला भूक लागली असेल म्हणून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांकडे अधिक शोध घेत असताना तिने बहिणीच्या घराकडे धाव घेतली. तेथून मुलाच्या रडण्याचा आवाज आला म्हणून तिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता मुलाच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याचे लक्षात आले. तर आरोपी नराधमही नग्नावस्थेत होता. तिने तत्काळ मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. तिने पतीला घटनेची माहिती देत वाकोला पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)