Join us
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये मुलावर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:06 IST

खारघरमधील केपीसी शाळेत आठ वर्षांच्या मुलावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केला. शुक्रवारी ही घटना घडली असून, शाळेत लहानग्यांच्या सुरक्षिततेचा विषय समोर आला आहे.

पनवेल : खारघरमधील केपीसी शाळेत आठ वर्षांच्या मुलावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केला. शुक्रवारी ही घटना घडली असून, शाळेत लहानग्यांच्या सुरक्षिततेचा विषय समोर आला आहे.शाळा सुरू असताना शिपाई सूर्यकांत चिखलेकर याने या मुलासोबत गैरवर्तणूक केली. या प्रकारामुळे या चिमुरड्याच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याने शुक्रवारपासून मुलगा मानसिक तणावात होता. पालकांना मुलाच्या वर्तणुकीत बदल झाल्याचे निदर्शनास आले. रविवारी हा मुलगा आंघोळ करताना त्याच्या गुप्तांगातून रक्त आल्याचे दिसून आले. या वेळी पालकांनी त्याला दवाखान्यात नेले असता त्याचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शिपाई सूर्यकांत चिखलेकर याला अटक करण्यात आली. दरम्यान, हा प्रकार दाबण्यासाठी शाळा प्रशासनाकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला असून, या प्रकारात केवळ शिपायावर कारवाई करून चालणार नाही, तर घटनेच्या वेळी वर्गावर असलेले शिक्षक, शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित मुलाच्या वडिलांनी केली आहे. यासंदर्भात शाळेचे चेअरमन रामनिक छेडा यांच्याकडे विचारणा केली असता, रविवारी या प्रकाराची माहिती मिळाली. मात्र प्रकार घडतेवेळी वर्गावर असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी काहीच माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.