Join us  

उबर चालकाचे महिलेसमोर अश्लील कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 5:34 AM

 उबर या खासगी अ‍ॅप बेस्ड टॅक्सीमधून प्रवास करताना चालकाने महिला प्रवाशासमोर अश्लील कृत्य करण्याचा प्रकार शुक्रवारी मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात घडला. महिलेने प्रसंगावधान दाखवत टॅक्सीमधून खाली उतरत पोलिसांत धाव घेतली.

मुंबई -  उबर या खासगी अ‍ॅप बेस्ड टॅक्सीमधून प्रवास करताना चालकाने महिला प्रवाशासमोर अश्लील कृत्य करण्याचा प्रकार शुक्रवारी मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात घडला. महिलेने प्रसंगावधान दाखवत टॅक्सीमधून खाली उतरत पोलिसांत धाव घेतली. महिलेच्या तक्रारीनंतर उबर प्रशासनाने संबंधित चालकाची हकालपट्टी केली आहे.शुक्रवारी सकाळी उबरमधून प्रवास करताना गाडी सिग्नलवर थांबल्यावर चालकाने अचानक अश्लील कृत्य करण्यास प्रारंभ केला. हा प्रकार घडल्याने धक्का बसलेल्या महिलेने त्वरित टॅक्सीमधून उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतापलेल्या चालकाने शिवीगाळी करण्यास प्रारंभ केला व काय झाले असे विचारायला सुरुवात केली. त्यावर महिलेने काय झाले ते तुला माहीत नाही का, असे सुनावले. किती भाडे झाले ते घे व बाजूला हो, असे त्या महिलेने प्रसंगावधान दाखवत सांगितले. चालकासोबत महिलेची बाचाबाची होत असताना तिथे जमलेल्या कोणीही मदतीला पुढे आले नसल्याची खंत या महिलेने व्यक्त केली. मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या असे प्रकार होत असताना प्रत्यक्षदर्शी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याबाबत महिलेने नाराजी व्यक्त केली. महिलेने उबरला मेल करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र मेल डिलिव्हर झाला नसल्याचा संदेश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस हजर नव्हता. उपस्थित असलेले नागरिक केवळ चालकासोबत माझा सुरू असलेला वादविवाद पाहण्यात गर्क होते. अशावेळी चालकाने टोकाची भूमिका घेऊन काही दुखापत केली असती तर किती भयानक परिस्थिती उद्भवली असती, अशी भीती महिलेने व्यक्त केली. चालकाने सांगितलेली प्रवासाची रक्कम मी दिली व सुटे पैसे घेण्यासाठीदेखील तिथे थांबले नाही. उबरमध्ये असे प्रकार वारंवार होत असल्याने ते असे प्रकार रोखू शकत नसल्यास त्यांनी कंपनी बंद करावी अथवा महिला प्रवाशांसाठी सुरक्षेची उपाययोजना आखावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत, उबर प्रशासनाने सांगितले की, उबरमध्ये असे प्रकार करणाऱ्यांना कोणताही थारा देण्यात येणार नसून संबंधित चालकाची उबरमधून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे.तरुणींसमोर आक्षेपार्ह कृत्य करणाºयाला अटकदिंडोशी येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन मैत्रिणींसमोर आक्षेपार्ह कृत्य करणाºया विकृत तरुणाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणी बोलत असताना २४ वर्षीय सलीम खान आला व त्यांच्यासमोर आक्षेपार्ह लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या या तरुणींनी धीर एकवटून मोबाइलवरून थेट पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार केली. तरुणाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणींनी त्याचा पाठलाग केला. या विकृताचा पाठलाग करताना तिथे असलेल्या इतर तरुणांनीदेखील या तरुणींना साथ दिली व त्या तरुणाला पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी खान हा कुरार व्हिलेजमधील संजय नगर येथील रहिवासी असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती दिंडोशी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली.

टॅग्स :गुन्हामुंबई