Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: April 12, 2015 02:01 IST

दोन लहान मुलांवर गेल्या सहा महिन्यांपासून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला कुर्ल्याच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली.

मुंबई : दोन लहान मुलांवर गेल्या सहा महिन्यांपासून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला कुर्ल्याच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. प्रकाश अहिरे असे या आरोपीचे नाव असून, तो या मुलांचा शेजारी आहे.कुर्ल्यात हा प्रकार घडला. अत्याचाराला बळी पडलेली दोन्ही मुले सख्खे भाऊ आहेत. त्यांची आई खासगी रुग्णालयात नर्स आहे. ती कामावर निघून गेल्यानंतर ही भावंडे घरी एकाकी असत. ही संधी साधून शेजारी राहणारा आरोपी प्रकाश त्यांना आपल्या घरी बोलवत असे आणि लैंगिक चाळे करी. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हा प्रकार मुलांकरवी समजताच आई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघाली. त्यावेळी प्रकाशने माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे प्रकरण तेथेच थांबले.मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकाशची विकृती पुन्हा बळावली. त्याने पुन्हा या मुलांवर अत्याचार सुरू केले. या वेळी त्याने पोलीस ठाण्यात गेलीस तर तुझ्यासोबत मुलांनाही ठार मारेन, अशी धमकी दिली. मात्र त्याच्या धमकीला न घाबरता आईने काल पोलीस ठाणे गाठून प्रकाश विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आज प्रकाशला त्याच्या राहत्या घरून अटक केली. (प्रतिनिधी)