Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी केले मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: March 18, 2017 02:56 IST

पवईत जन्मदात्या ३९ वर्षांच्या वडिलांनी ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वडिलांना पॉक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत

मुंबई : पवईत जन्मदात्या ३९ वर्षांच्या वडिलांनी ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वडिलांना पॉक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई परिसरात तक्रारदार मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. आई कामावर गेल्यानंतर ती एकटीच घरात असे. याच संधीचा फायदा घेत नराधम वडिलांची तिच्यावर वाईट नजर पडली. त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाला काही सांगू नये म्हणून धमकी दिली. आई घरी येताच मुलीने वडिलांच्या कृत्याला वाचा फोडली. आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.