Join us
Daily Top 2Weekly Top 5

नालासाेपाऱ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पूर्वेतील नागीणदास पाडा येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर सोमवारी रात्री छापा मारून अनैतिक मानवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा : पूर्वेतील नागीणदास पाडा येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर सोमवारी रात्री छापा मारून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका करून एका आरोपीविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील नागीणदास पाडा येथील सिल्वर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून सोमवारी रात्री ९.४५च्या सुमारास काही रुपये देऊन बोगस ग्राहक लॉजच्या सदनिकेमध्ये पाठवले. पोलिसांना खात्री झाल्यावर या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, सहायक फौजदार महेश गोसावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या टीमने छापा मारून आरोपींकडून बोगस ग्राहकाने दिलेली रोख रक्कम स्वीकारल्याचे आढळले. पोलिसांनी नालासोपारा पूर्वेतील २५ ते २७ वयोगटांतील दोन पीडित तरुणींची सुटका करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी मोजामअली दिलबहार शेख (३३) याने पीडित तरुणींना पैशाचे प्रलाेभन दाखवून वेश्यागमनासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तुळिंज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.