Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लेटलेट्स डोनेशनची ‘पंच्याहत्तरी’ अखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:56 IST

मुंबई : ‘लोकमत’ रक्तदानाच्या महायज्ञात ७७ बाटल्या रक्त संकलन करणारे हेल्पिंग हॅन्डस् अँड असोसिएशनचे प्रमुख संजय मोदी यांनी प्लेटलेट्स ...

मुंबई : ‘लोकमत’ रक्तदानाच्या महायज्ञात ७७ बाटल्या रक्त संकलन करणारे हेल्पिंग हॅन्डस् अँड असोसिएशनचे प्रमुख संजय मोदी यांनी प्लेटलेट्स दानाची पंच्याहत्तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण केली. ‘लोकमत रक्ताचे नाते’ या शिबिरात त्यांनी हा निश्चय केला होता.

टाटा मेमोरियल रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. त्यानुसार आतापर्यंत ७४ वेळा त्यांनी प्लेटलेट्स दान केले आहे.

दरम्यान ‘लोकमत’ आणि बोरिवली येथील सिद्धार्थ नगर परिसरात त्यांची संस्था हेल्पिंग हॅन्डस् अँड असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हा निर्धार केला होता. त्यानुसार गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत २३ जुलै रोजी त्यांचे पंच्याहत्तरावे प्लेटलेट्स दान त्यांनी पूर्ण केले. यासाठी त्यांनी त्यांचे मित्र आणि आतापर्यंत अडीचशे वेळा प्लेटलेट्स दान करणाऱ्या अरुण केजरीवाल यांचे तसेच पत्नी फाल्गुनी आणि मोदी परिवाराचे आभार मानले आहेत.