खडवली - ़येथील भातसा नदीत शुक्रवारी एक सात वर्षीय मुलगा बुडाला. तो बुडाल्याचे पाहून आसपास आंघोळ करणार्यांनी त्यास बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता़ सोबतची मुले पळून गेल्यामुळे त्याची ओळख मात्र पटू शकली नाही.घटना समजताच खडवली चौकीतील पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ या मुलाबरोबर आणखी तीन मुले होती, अशी माहिती मिळाली. मंुबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगरपासून अनेक पर्यटक या भातसा नदीवर येतात़ अनेक मुले घरी न सांगताच भातसा नदीवर येत असल्याने अशांपैकी तो असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़
खडवलीच्या भातसा नदीत सात वर्षीय मुलगा बुडाला
By admin | Updated: May 10, 2014 20:52 IST