Join us
Daily Top 2Weekly Top 5

सात दुकाने फोडली

By admin | Updated: May 21, 2014 05:04 IST

डहाणू तालुक्यातील कासा व चारोटी बाजारपेठेतील सात दुकाने फोडून चोरट्यांनी पंचवीस ते तीस हजार लुटून पोबारा केला.

कासा : डहाणू तालुक्यातील कासा व चारोटी बाजारपेठेतील सात दुकाने फोडून चोरट्यांनी पंचवीस ते तीस हजार लुटून पोबारा केला. तालुक्यातील कासा बाजारपेठेतील आदित्य मेडिकल स्टोअर, पल्लवी बियर शॉप, मोबाइलचे दुकान व एक केस कर्तनालय अशी पाच दुकाने तर चारोटी नाक्यावरील सुनिता मेडिकल स्टोअर आणि समोरील एक मोबाइलचे दुकान अशी दोन दुकाने पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानांचे शटर उघडून त्यामधील रोकड व काही सामान चोरले. दुकानामध्ये रोकड जास्त नसल्याने मोबाइलच्या दुकानातून काही मोबाइल व तर दुकानातून सामानही चोरले. यामध्ये एकूण पंचवीस ते तीस हजार रोकड चोरल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ही दुकानेही कासा बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत तर चारोटी नाक्यावरही महामार्गाजवळ असतानाही चोरी झाल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही चोरी एकाच रात्रीत झाली असून यामध्ये चोरट्यांनी शटरचे लॉक न तोडता विशिष्ट हत्याराने वरून शटर उघडले आहे. या प्रकारामुळे चारोटी कासा बाजार पेठेतील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान अद्याप चोरांचा तपास लागला नसून कासा पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहे. (वार्ताहर)