ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०६ - मुंबईतील काळबादेवी येथील आगीची दुर्घटना ताजी असतानाच येथील पवईमध्ये लेक होम इमारतीच्या १४ व १५ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर १७ जण जखमी झाले असून त्यांना येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लेक होम या २२ मजली इमारतीला सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली होती, त्यानंतर घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले आणि २ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मात्र इमारतीच्या १४ व्या मजल्यावर एसीत स्पार्क होऊन लागलेल्या भीषण आगीमुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, तर तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर येथील हिरानंदानी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.