Join us  

गोवंडीत घर कोसळून सात जण जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 5:20 AM

गोवंडी येथे घर कोसळल्याने सात जण जखमी झाले. येथील रफीक नगर रोडलगतच्या रसुल मशिदीजवळील तळमजला अधिक पहिला मजला असलेले संपूर्ण घर कोसळण्याची घटना रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास घडली.

मुंबई - गोवंडी येथे घर कोसळल्याने सात जण जखमी झाले. येथील रफीक नगर रोडलगतच्या रसुल मशिदीजवळील तळमजला अधिक पहिला मजला असलेले संपूर्ण घर कोसळण्याची घटना रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले. तय्युम शेख (४०), मोहम्मद शब्बीर (२३), मुरार शेख (३५), अब्दुल कुलदास (२०), सलीम शेख (३०), बद्रुनिसा शेख (४८) आणि शब्बीर शेख (१५) अशी जखमींची नावे आहेत.या सातही जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी सोडण्यात आले असून तिघांवर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत घराचे पडलेले ढिगारे उचलण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :मुंबईअपघात