Join us

मोटरसायकल अपघातात तलासरीत सात जखमी

By admin | Updated: December 22, 2014 23:04 IST

तलासरी उधवा रोडवर बाजारपेठेमधून एमएटीवर हॉटेलमधील ४ मुलांना बसवून घेऊन जाणा-यामोटरसायकलस्वाराने समोरून येणा-या मोटरसायकलला

तलासरी : तलासरी उधवा रोडवर बाजारपेठेमधून एमएटीवर हॉटेलमधील ४ मुलांना बसवून घेऊन जाणा-यामोटरसायकलस्वाराने समोरून येणा-या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनावरील सातजण गंभीर जखमी झाले.तलासरी नाक्यावर असलेल्या हॉटेलचा चालक आपल्या ४ बालकामगारांना एमएटीवर बसवून घराकडे जात असताना त्याने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये एमएटी चालकासह चार बालकामगार आणि दुसऱ्या मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले.या अपघातात लक्षी नन्हया शनवार (१४), आत्माराम सुरेश गोंड (१५), महेश धर्मा भेलका (१५), जयराम नन्हु बेंदर (१५), राजू काकड चौधरी (५५), अशोक सुरेश गावीत (२५), प्रविण बच्चु चौधरी (२४) असे सात गंभीर जखमी झाले.सध्या तलासरी बाजारपेठ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात तरूण मोटरसायकलस्वार धूम स्टाईल वाहन चालवित असून मोटरसायकलवर तीन ते चार जणांना बसवून वेगाने जात-येत असतात पण याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे असे अपघात होत आहेत. (वार्ताहर)