लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सदनिका विकण्याच्या बहाण्याने मालाडच्या ५७ वर्षीय महिला डॉक्टरसह, अन्य काही सभासदांना साडेचार वर्षांत ७ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मालाड पश्चिमेत डॉक्टर अल्बन आल्फेड पैस (५७) कुटुंबासह राहतात. आॅक्टोबर २०१२ मध्ये आरोपींच्या टोळीने त्यांच्यासह येथील अन्य सभासदांची घर विक्रीच्या नावे फसवणूक केली. (प्रतिनिधी)
सात कोटींची फसवणूक
By admin | Updated: May 6, 2017 03:58 IST