Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोरमध्ये एका रात्रीत सात घरफोड्या

By admin | Updated: December 2, 2014 23:25 IST

मनोर बाजारपेठेत एका रात्रीत सात ठिकाणी दुकान, गोडावून फोडून चोरट्यांनी माल लंपास केला. मात्र मनोर पोलीस आरोपींना पकडण्यास अपयशी झाले

मनोर : मनोर बाजारपेठेत एका रात्रीत सात ठिकाणी दुकान, गोडावून फोडून चोरट्यांनी माल लंपास केला. मात्र मनोर पोलीस आरोपींना पकडण्यास अपयशी झाले. सध्या मनोर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.काल रात्री मनोर बाजारपेठेत जयश्री किराणा, निलेश इलेक्ट्रॉनिक मोबाईल, अदम टेलर्स, जय कलेक्शन कपड्यांचे दुकान, सुजय ट्रेनिंग कंपनी, संजरी इलेक्ट्रॉनिक अशी एकूण सात दुकाने चोरट्यांनी फोडून हजारो रूपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. गेल्या महिन्यात तलाठी कार्यालय टेण नाका येथून कपाट फोडून कॉम्प्युटर चोरीला गेला. यापूर्वीही वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी लॅपटॉप व कागदपत्रांची चोरी केली आहे. अनेक चोऱ्या आज पर्यंत झाल्या असून एकाही चोरट्याला मनोर पोलीसांनी आजपर्यंत पकडले नाही. त्यामुळे मनोर मधील संघटना व ग्रामस्थांकडून पोलीसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मनोर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)