Join us

१८ ग्रॅम एमडी हस्तगत केलेल्या आरोपीला सत्र न्यायालयाकडून जामीन

By रतींद्र नाईक | Updated: November 1, 2023 20:55 IST

४० हजाराच्या जात मुचलक्यावर आरोपीची सुटका

मुंबई: १८ ग्रॅम एमडी सापडल्याने पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. ४० हजाराच्या जात मुचलक्यावर विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भागवत यांनी आरोपीची सुटका केली आहे.

शिवडी, बीपीटी मार्ग पुलाजवळ रात्री पावणे बाराच्या सुमारास एक अज्ञात इसम गस्त घालणाऱ्या पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याच्या खिशात पोलिसांना १८ ग्रॅम एमडी सापडले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या व अन्य एका विरोधात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी आरोपीने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भागवत यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा न्यायालयाने अटी शर्तीसह आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

टॅग्स :मुंबई