Join us

सेन्सेक्स पुन्हा उसळला

By admin | Updated: October 29, 2014 08:45 IST

खनिज तेलाच्या उतरलेल्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांनी सुरू केलेली खरेदी याच्या बळावर मंगळवारी शेअर बाजारात तेजी परतली.

मुंबई : खनिज तेलाच्या उतरलेल्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांनी सुरू केलेली खरेदी याच्या बळावर मंगळवारी शेअर बाजारात तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 128 अंकांनी वर चढून 26,880.82 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 36 अंकांनी वाढून 8 हजार अंकांच्या वर गेला. 
औषधी आणि बँकिंग क्षेत्रतील तेजीमुळे बाजाराला बळ मिळाले. व्याजदरात कपात होण्याची वाढलेली शक्यता आणि चांगला परतावा मिळण्याची आशा यामुळे बाजारात उत्साह आहे. काल एक दिवसाच्या मंदीनंतर बाजाराने तेजीचा प्रवाह कायम ठेवला आहे. 
30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सकाळची सुरुवातच मजबुतीने झाली. नंतर ती कायम राहिली. दुपार्पयत तो फारसा वर चढला नाही; मात्र दुपारनंतर त्याने पुन्हा गती घेतली. एक महिन्याची उंची गाठताना सेन्सेक्स 127.92 अंक अथवा 0.48 टक्क्यांची वाढ मिळवून 26,880.82 अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स 98.15 अंक अथवा 0.37 टक्क्यांनी कोसळला होता. आज मात्र मंदीचे मळभ दूर झाले. 
50 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील एनएसईचा सीएनएक्स निफ्टी 35.90 अंक अथवा 0.45 टक्क्यांनी वर चढला. 8 हजार अंकांचा टप्पा ओलांडून निफ्टी 8,027.60 अंकांवर बंद झाला. 
ब्रोकरांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हची आढावा बैठक मंगळवारी सुरू झाली. ही बैठक बुधवारी संपेल. त्यानंतर बैठकीतील निर्णयाची घोषणा होईल. त्याआधी बाजारांनी मजबुती मिळविण्याचा प्रय} केला आहे. रॅनबॅक्सीचा शेअर 6 टक्क्यांनी वर चढला. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी चांगली राहिल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास दुणावला आहे. ही कंपनी सन फार्मामध्ये विलीन होत आहे. 4 अब्ज डॉलरचा हा सौदा आहे. रॅनबॅक्सीचा शेअर चढल्याने सन फार्मालाही तेजीचा लाभ मिळाला. सन फार्माचा शेअर सर्वाधिक 4.31 टक्के वाढला. रॅनबॅक्सीच्या मिळकतीमुळे बाजाराला संजीवनी मिळाली.
बाजाराशी संबंधित सूत्रंनी सांगितले की, रिझव्र्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये व्याजदरांचा आढावा घेतला जाईल. बांधकाम क्षेत्रला बळ देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याचे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. या पाश्र्वभूमीवर डिसेंबरच्या बैठकीत रिझव्र्ह बँकेवर व्याज दर कपातीचा दबाव असेल. याचा योग्य संदेश गुंतवणूकदारांत गेला आहे.
अमेरिकेतील घरांची विक्री आणि वस्तू उत्पादनाची आकडेवारी नकारात्मक राहिली आहे, त्यामुळे आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. गुंतवणूकदार फेडरल रिझव्र्हच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि जपान येथील बाजार सुमारे 0.33 टक्के ते 0.38 टक्क्यांनी कोसळले. चीन, हाँगकाँग आणि तैवान येथील बाजार मात्र 1.63 टक्के ते 2.07 टक्क्यांनी वर चढले. 
युरोपीय बाजार सकाळच्या सत्रत तेजी दर्शवीत होते. सीएसी 0.52 टक्क्यांनी, डीएएक्स 1.36 टक्क्यांनी, तर एफटीएसई 0.51 टक्क्यांनी तेजीत होता. (प्रतिनिधी) 
 
4सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 पैकी 17 कंपन्यांचे शेअर्स वर चढले. 13 कंपन्यांचे शेअर्स कोसळले. 
4सिप्ला, टाटा पॉवर, एसबीआय, गेल इंडिया, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी आणि भेल या कंपन्यांना तेजीचा लाभ झाला. हीरो मोटो कॉर्प, भारती एअरटेल, एचयूएल, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स कोसळले.
4बाजाराची एकूण उलाढाल सकारात्मक राहिली. 1,510 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. 1,370 कंपन्यांचे शेअर्स कोसळले. बाजाराची एकूण उलाढाल 2,763.91 कोटी रुपये इतकी राहिली. सोमवारी ती 2,613.97 कोटी रुपये होती.