Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्सची पुन्हा 26 हजारांवर ङोप

By admin | Updated: July 23, 2014 01:31 IST

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तेजीचा सिलसिला सलग सहाव्या दिवशीही कायम राहिला.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तेजीचा सिलसिला सलग सहाव्या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सेन्सेक्स 311 अंकांनी ङोपावून पुन्हा एकदा 26,क्क्क् अंकांच्या पातळीवर गेला. मोठय़ा कंपन्यांचे तिमाही निष्कर्ष अपेक्षेहून चांगले राहिल्याने गुंतवणूकदारांची बाजार धारणा बळकट झाली.
ब्रोकर्सनी सांगितले की, विदेशी संस्थांचा सातत्यपूर्ण प्रवाह, व्यापक आर्थिक संकेतांकांमध्ये सुधारणा, मान्सूनची प्रगती व जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बाजारधारणा बळकट होण्यास मदत झाली.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअरचा सेन्सेक्स 25,784.48 अंकांवर वधारत्या कलाने उघडल्यानंतर 26,क्5क्.38 अंकांच्या उच्चांकी पातळीवर गेला. दिवसअखेर तो 31क्.63 अंक वा 1.21 टक्क्यांच्या तेजीसह 26,क्25.8क् अंकावर बंद झाला. गेल्या 8 जुलै रोजीही सेन्सेक्सने 26,19क्.44 अंकाच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. गेल्या सहा सत्रंत सेन्सेक्स 1,1क्8 अंक वा 2.3 टक्क्यांचा लाभ झाला आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 83.65 अंक वा 1.क्9 टक्क्यांच्या तेजीसह 7,767.85 अंकांवर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने 7,773.85 अंकांच्या उच्चंकी पातळीवरही गेला होता. कोटक सिक्युरिटीजचे दीपेन शाह यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील पाठबळ, भू-राजकीय तणावात झालेली घट, अर्थव्यवस्थेच्या वाढीविषयीची आशा यामुळे बाजारधारणा बळकट झाली. गेल्या काही दिवसांत मान्सून देशभरात पोहोचला आहे. कंपन्यांचे 
तिमाही निष्कर्ष विशेषत: आयटी संस्थांचे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आलेत.  मारुती, एल अँड टी, एम अँड एम आणि भेल यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदली गेली. (प्रतिनिधी)
 
4सेन्सेक्सच्या 3क् शेअरमध्ये 25 कंपन्यांना लाभ झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला लाभ झाला. एचडीएफसी, टीसीएस, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयटीसी, इन्फोसिस व विप्रोच्या शेअरमध्ये वाढ नोंदली गेली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी 161.17 कोटी रुपयांची शेअर खरेदी केल्याचे सूत्रंनी सांगितले.