Join us

सेन्सेक्स 87 अंकांनी मजबूत

By admin | Updated: October 14, 2014 01:52 IST

धातू, बँकिंग आणि आयटी क्षेत्रतील कंपन्यांच्या समभागांची जोरात विक्री झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 86 अंकांनी वर चढला.

मुंबई : धातू, बँकिंग आणि आयटी क्षेत्रतील कंपन्यांच्या समभागांची जोरात विक्री झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 86 अंकांनी वर चढला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी 24.30 अंकांनी वधारला.
ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक क्षेत्रची कामगिरी कमजोर राहिल्याचे वृत्त आल्यामुळे शेअर बाजारात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी सेन्सेक्स पड खाऊन 26,275.07 अंकांवर उघडला. त्यानंतर तो आणखी कोसळला. एका क्षणी तो 26,092.69 अंकांर्पयत खाली घसरला होता. विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचे वातावरण गेल्या आठवडय़ात बाजारात तयार झाले होते. त्याचप्रमाणो गेल्या शुक्रवारी अमेरिकी बाजारही कोसळला होता. याचा संयुक्त परिणाम बाजारावर दिसून आला. 
वास्तविक विदेशी संस्थागत गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी आज बाजारात जोरदार खरेदी केली. 30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स त्यामुळेच हळूहळू तेजीत येत गेला. एका क्षणी तो 26,443.16 अंकांवर पोहोचला होता. दिवसअखेरीस 86.69 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 26,384.07 अंकांवर बंद झाला. कालच्या बंदच्या तुलनेत ही वाढ 0.33 टक्के जास्त आहे. चीनच्या व्यापारांची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहिल्यामुळे, तसेच जागतिक तेल बाजारात किमती चार वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळेही बाजारातील धारणा मजबूत झाली.
शुक्रवारी नफा वसुली आणि युरो क्षेत्रतील वाढीच्या बाबतीतील चिंता यामुळे सेन्सेक्स 340 अंकांनी कोसळला होता. (प्रतिनिधी)