Join us

सेन्सेक्स २९ हजारांवर

By admin | Updated: January 23, 2015 01:29 IST

सातत्यपूर्ण भांडवली प्रवाहाच्या बळावर शेअर बाजारांनी गुरुवारी मोठी भरारी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच २९ हजार अंकांवर गेला.

मुंबई : सातत्यपूर्ण भांडवली प्रवाहाच्या बळावर शेअर बाजारांनी गुरुवारी मोठी भरारी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच २९ हजार अंकांवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८ हजार अंकांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. नरेंद्र मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे. सरकारकडून आर्थिक सुधारणांसाठी घेण्यात येत असलेला पुढाकार आणि जागतिक पातळीवरील अनुकूल स्थिती असे दुहेरी बळ बाजाराला मिळाले आहे. आरोग्य, भांडवली वस्तू आणि वाहन या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी खरेदी दिसून आली. त्याचा परिणाम म्हणून बाजाराने इतिहासात प्रथमच २९ हजार अंकांना गवसणी घातली. (प्रतिनिधी)