Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 27, 2014 00:25 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटना सुरूच आहेत

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटना सुरूच आहेत. नेरूळ व पनवेलमध्ये झालेल्या तीन घटनांमध्ये तब्बल १ लाख ३० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. नेरूळ सेक्टर २४ मधील स्वामी अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या राजश्री नाईक या शनिवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीसमोरून जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले आहे. याच परिसरात रात्री ९ वाजता सेक्टर १८ ए मधील शिवशक्ती डेरीसमोरून पायी जाणार्‍या वैशाली निकांडे यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. १५ मिनिटांच्या अंतराने दोन ठिकाणी मंगळसूत्र हिसकावल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पनवेलजवळील सोमटने येथे राहणार्‍या प्रतिभा मुंढे या शनिवारी गोवा - पनवेल रोडवरून पतीसोबत मोटारसायकलने जात होत्या. पळस्पेजवळ पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले आहेत.