नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ३ मध्ये बेवारस बॅग आढळल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावून बॅगच्या तपासणीत कपडे आढळून आले. रेल्वे स्टेशनजवळील सुपर मार्केटमध्ये सकाळी बेवारस बॅग आढळून आली. गर्दीच्या ठिकाणी खूप वेळ बॅग एकाच ठिकाणी असल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. रबाळे पोलिस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. श्वान व बॉम्ब शोधक पथकासही या ठिकाणी पाचारण करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांनीही मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी बॅग ताब्यात घेवून तपासणी केली असता त्यामध्ये कपडे असल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरक्ष गोरजे यांनी सांगितले की बॅगेत काहीही आढळून आले नसून याविषयी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बेवारस बॅगमुळे खळबळ
By admin | Updated: August 27, 2014 00:39 IST