नंदकुमार टेणी, ठाणेठाणे जिल्ह्यात झालेल्या एकूण मतांपैकी सर्वाधिक मते शिवसेनेला मिळाली असून ती ८९७१२९ एवढी आहेत. तर त्या खालोखाल भाजपला ८६००१० एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी मिळविलेल्या मतांची संख्या ५६६५६७ एवढी आहे. तर चौथे स्थान मिळविणाऱ्या काँग्रेसला २२८३९४ मते मिळाली आहे. मनसे पाचव्या स्थानावर असून तिला अवघी १६७२५३ मते मिळाली आहेत. तर बसपाला ३४०२९ मते मिळाली आहेत. कम्युनिस्टांना ४९१४ मते मिळाली आहेत. जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कोणी किती जिंकले, हे जितके महत्वाचे असते तितकेच जिल्ह्यात कुठल्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली. ही बाबही महत्वाची असते. त्यातून त्या पक्षाचा जनाधार सिद्ध होत असतो. हे ध्यानी घेता ठाणे जिल्ह्यावर सेनेने आपले वर्चस्व पूर्णपणे सिद्ध केल्याचे जाणवते.
जिल्ह्यात सेनेला सर्वाधिक मते
By admin | Updated: October 22, 2014 00:04 IST