Join us
Daily Top 2Weekly Top 5

युतीसाठी भाजपाकडून सेनेला निमंत्रण

By admin | Updated: January 11, 2017 12:46 IST

मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युतीसाठी भाजप सकारात्मक आहे. आजपासून युतीच्या जागावाटपासाठी चर्चा सुरु करणार असल्याचे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युतीसाठी भाजप सकारात्मक आहे. आजपासून युतीच्या जागावाटपासाठी चर्चा सुरु करणार असल्याचे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. शिवसेनेनं युतीची अपेक्षा बोलून दाखविल्यानं भाजपनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेसोबत महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
शिवसेना आपला जुना मित्र आहे. आपली भूमिका युती व्हावी अशीच असली पाहिजे, असे मुख्यमंत्री कालच्या बैठकीत म्हणाले होते. तर महापालिका निवडुकांची तारीख जवळ येत आहे, युती काय निवडणूक झाल्यावर करायची असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला होता. 
 
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले की, प्रदेशाअध्यक्ष रावसाहेब दाणवे लवकर युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेला निमंत्रण देतील.