Join us  

ज्येष्ठ वकील माधवराव वाघ यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:53 PM

ज्येष्ठ वकील माधवराव वाघ यांचे मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ वकील माधवराव वाघ यांचे मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. ते शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक होते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि व्ही.पी.सिंग यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. तसेच मंडल कमिशनच्या समितीवरही त्यांनी काम केले होते. 

मुंबईत अनेक वर्षे त्यांनी उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस केली. सह्याद्री वाहिनीवरील कोर्टाची पायरी या कार्यक्रमाची मूळ कल्पना त्यांचीच होती. शिवाय या कार्यक्रमाचे निवेदनही त्यांनीच केले. या मालिकेत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत त्यावेळी खुपच गाजली होती. धुळे व जळगाव परिसरात अनेक शाळा व महाविद्यालये सुरू केली. यातील समता शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे ते अध्यक्ष होते. हे शिक्षण मंडळ आता शैक्षणिक क्षेत्रातील मोठी संस्था नावारूपाला आली आहे. त्यांच्यावर उद्या (ता. २७) दुपारी १२ वाजता विलेपार्ले पवनहंस जवळील स्मशीनभूमीत अंत्यसंसकार करण्यात येतील.

त्यांच्या मागे पुत्र बांधकाम व्यावसायिक विवेक, मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदेश, कन्या म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले आणि डॉ. प्रज्ञा तायडे आणि नातवंडे असा परिवार आहे.

 

टॅग्स :मुंबई