Join us

वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांचे प्रदीर्घ आजराने निधन

By संतोष आंधळे | Updated: September 27, 2022 17:24 IST

गेल्या चार महिन्यापासून त्यांच्यावर सुरू होते उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ ओम श्रीवास्तव यांचे मंगळवारी ब्रीच कॅण्डी रुग्णलयात प्रदीर्घ आजराने निधन झाले. ते ५५ वर्षाचे होते. गेल्या चार महिन्यापासून त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोना काळात त्यांनी खासगी रुग्णालयासोबत महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जाऊनही सेवा बजावली होती. ते साथ रोग तज्ज्ञ म्हणून जसलोक रुग्णलाय  आणि सर एच एन रिलायन्स रुग्णालयात कन्सलटंट म्ह्णून कार्यरत होते. त्याच्या साथरोग शास्त्रातील अभ्यासामुळे राज्य शासनाने त्यांची कोरोना राज्य कृती दलावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनांनंतर शोक व्यक्त करताना, वरिष्ठ डायबेटॉलॉजिस्ट आणि राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी सांगितले कि, " खूप दुःखद घटना आहे. त्यांनी साथरोग या विषयवार परदेशात जाऊन शिक्षण घेतले होते. मायदेशी परत आल्यानंतर त्यांनी गरीब रुग्णांची सेवा केली होती. ते सर्वाना घेऊन काम करत असत आमच्या कोरोना कृती दलातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साथीचे आजार या विषयावर त्यांनी प्राविण्य मिळविले होते."

टॅग्स :मुंबईडॉक्टर