Join us

प्रसाधनगृहांविषयी सूचना पाठवा - आरटीपी

By admin | Updated: June 30, 2015 23:40 IST

महापालिका महिला प्रसाधनगृहाच्या वापरासाठी १ रुपया शुल्क आकारणार असल्याचे कळताच ‘राइट टू पी’ने (आरटीपी) आयुक्तांची भेट मागितली होती.

मुंबई : महापालिका महिला प्रसाधनगृहाच्या वापरासाठी १ रुपया शुल्क आकारणार असल्याचे कळताच ‘राइट टू पी’ने (आरटीपी) आयुक्तांची भेट मागितली होती. पण त्यांना भेटीची वेळ न देता आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, वॉर्डनिहाय प्रसाधनगृहाविषयी सामान्यांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. पण महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली नाहीत. महापालिका गेल्या एका वर्षापासून आरटीपीबरोबर मोफत महिला प्रसाधनगृहासाठी काम करत आहे. पण गेल्याच आठवड्यात त्यासाठी १ रुपया शुल्क आकारणार असल्याचे जाहीर केले. यामुळे संभ्रमात असलेल्या आरटीपी टीमने आयुक्तांच्या भेटीची वेळ मागण्यासाठी शनिवार, २७ जूनला पत्र लिहिले होते. यानंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. आरटीपी कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी सांगितले, आरटीपी टीमने महिला प्रसाधनगृहासाठी दोन वेळा मार्गदर्शक तत्त्वे तयार करून दिली होती. या वेळी त्यातले काही मुद्दे बदलत महापालिकेने ही तत्त्वे मान्य केली. आता महापालिकेने सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारच्या सूचना, हरकती असतील तर सांगा, असे आवाहन केले आहे. पण त्यांनी सूचना कोणाकडे द्याव्यात, याविषयी निश्चित असे काहीच सांगितले नाही. झोपडपट्ट्या आणि रस्त्यांच्या कडेला सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी या सूचना मागवण्यात आल्या आहेत. महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली नसल्यामुळे आरटीपीने मार्गदर्शक तत्त्वे मागितली आहेत. शौचालयांच्या यादीचीही मागणी केली आहे. वॉर्ड अधिकाऱ्याकडे सामान्यांनी सूचना, हरकती नेऊन द्याव्यात, असेही आवाहन आरटीपीने केले असल्याची माहिती कार्यकर्त्या मुमताज यांनी दिली. (प्रतिनिधी)इथे पाठवा सूचना महापालिकेने वॉर्डनिहाय शौचालयांविषयी सूचना, हरकती मागवल्या आहेत. सामान्यांनी या सूचना राइट टू पीकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. १्रॅँ३३ङ्मस्रीीे४ेुं्र@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात.